Friday, 2 October 2015

पुण्यातील संजय लोंढे हे 'शांताबाई'चे गीतकार आहेत. संजय लोंढेंच्या या गाण्याने राज्यभरात धुमाकूळ घातला. "शांताबाई‘ हे गाणं पहिल्यांदा दहीहंडीत वाजलं आणि गणेशोत्सवात हे गाणं हीट झालं.
 
संजय लोंढे या गीतकार-गायकानं हे गाणं तयार केलं आहे. मात्र या गाण्याची आणि खुद्द गीतकार संजय लोंढेची कहाणी अतिशय करूण आहे.

आठ-बाय दहाच्या खोपटात संसार

संजय लोंढेंनी संपूर्ण राज्यातील तरूणाईला आपल्या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरायला लावला. मात्र स्वत: संजय लोंढे आठ बाय दहाच्या खोलीतच संसाराचं गीत गात आहे. लोंढे कुटुंबीय पुण्याच्या नाना पेठ भागातील राजेवाडी इथं भाड्याच्या झोपडीत राहतात.
 
या झोपडीत संजयची पत्नी, दोन मुली, मुलगा आणि अपंग आई संजयच्या साथीने आयुष्याचं जीवनगाणं गातात.
 
मोठी मुलगी प्राजक्ता डीटीएड करते, धाकटी रसिका दहावीत, तर मुलगा पवित्र सहावीत शिकतो.

वीस वर्षापूर्वी गाणं रचलं

शांताबाई, शांताबाई हे गाणं म्हटलं तर खूप नवं आणि म्हटलं तर खूप जुनं आहे. यंदाच हे गाणं सर्वांच्या कानावर पडलं. मात्र हे गीत संजय यांनी तब्बल 20 वर्षांपूर्वी रचलंय.

चिमुकल्या मुलीसाठी गाणं रचलं

मुलगी प्राजक्ता लहान असताना संजय तिला मांडीवर घेऊन "शांताबाई, शांताबाई‘ असं गुणगुणत असत. त्यांच्या तालावर ती चिमुकली डुलायची. त्यामुळे त्याचवेळी 'शांताबाई, शांताबाई' हे गाणं अस्तित्वात येण्यास सुरुवात झाली.

गणेशोत्सवापूर्वी ध्वनीमुद्रित

'शांताबाई, शांताबाई' हे गाणं गेल्या वीस वर्षांपासून संजय यांच्या मनात होतं. गणेशोत्सवापूर्वी तीन महिने आधी त्यांनी हे गाणं स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलं. हेच गाणं यंदाच्या गणेशोत्सवात सर्वाधिक गाजलं.

"शांताबाई... हे गाणं लोकसंगीताचा बाज असलेलं, पण मराठी रॅपच्या स्वरूपातलं आहे" असं संजय यांनी सांगितलं.

देव धनगर वाड्यात घुसला

यापूर्वीच गाजलेलं "देव धनगर वाड्यात घुसला" हे गाणंही संजय यांनीच गायलं आहे.  हे गाणंही अजूनही मिरवणुकांमध्ये अनेकांना ठेका धरायला लावतं.

भावाचा उपचार

संजयचा लहान भाऊ अनिल मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होता. त्यांच्या उपचारासाठी पैसे हवे होते. त्यामुळे संजय यांनी "शांताबाई... हे गाणं एका कॅसेट कंपनीसाठी गायलं. त्या पैशातून त्यांनी भावाचा उपचार केला. मात्र सव्वा महिन्यापूर्वीच भावाचं निधन झालं.

लहानपणापासून गाण्याची आवड

संजय लोंढे हे आठवी पास आहेत. त्यांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. लहानपणी ते रेडिओ गळ्यात अडकवून गाणी गुणगुणत. त्यांनी मराठी रॅप, खंडोबाची गाणी लिहिली आहेत.

संजयची गाणी दिग्गजांनी गायली

संजय यांनी अनेक गाणी रचली आहेत. त्यांच्या गाण्यांना प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, वैशाली सामंत, सुदेश भोसले या गायकांचाही आवाज लाभला आहे.

Thursday, 27 August 2015

Good People (2014) [Dual Audio] 720p Hindi English Dubbed

...
Director: Henrik Ruben Genz
Writers: Marcus Sakey
Stars: James Franco, Kate Hudson, Tom Wilkinson
Quality: 720p BluRay
Language: Hindi + English
File Size: 1.4 GB

Download
Uptobox


Watch
hindi dubbed hollywood movies telugu movies in hindi dubbed hindi dubbed south indian
 movies hindi dubbed movies watch online tamil movies in hindi dubbed hindi dubbed 
movies 2015 hindi dubbed download magadheera in hindi dubbed